अहमदाबाद : गुजरात निवडणुकांची तारीख जशी जवळ येतेय तसं काँग्रेस नेत्यांमध्ये फूट आणि बंडखोरी पाहायला मिळत आहे. तिकीट मिळवण्यासाठी काँग्रेस उमेदवारांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. बडोद्याच्या सावली विधानसभेच्या जागेवर काँग्रेसच्या तीन नेत्यांनी अर्ज दाखल केला आहे. २७ नोव्हेंबरपर्यंत काँग्रेस पार्टीची संमती दिली नाही तर या उमेदवारांचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे.


काँग्रेसकडून सारवासारवी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उमदेवारीवरून बंडखोरी पाहायला मिळत असली तरी काँग्रेसनं मात्र याबाबत सारवासारव केली आहे. काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिल्यावर इतर दोन जणं अर्ज मागे घेऊन उमेदवाराचा प्रचार करतील, अशी प्रतिक्रिया काँग्रेसनं दिली आहे.


निवडणुकीआधीही काँग्रेसमध्ये गटबाजी मोठ्याप्रमाणावर उफाळून आली होती. काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये दाखल झाले होते. तसंच अनेक जण भाजपमध्ये दाखल व्हायच्या तयारीमध्ये होते. पण सध्याच्या आमदारांना परत तिकीट देण्याचं आश्वासन दिल्यावर या आमदारांचा विरोध मावळला होता.