गुजरात: 6 मतदान केंद्रांवर फेरमतदानास सुरूवात
या मतदानाची मतमोजणीही उद्याच (18, डिसेंबर) होणार आहे.
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचा निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. निकालाची अंतीम वेळ क्षणाक्षणांनी जवळ येत आहे. दरम्यान, या उत्सुकतेतच गुजरातमधील 6 मतदान केंद्रांवर रविवारी फेरमतदानास सुरूवात झाली. सकाळी 8 वाजलेपासून सुरू असलेली मतदान प्रक्रिया संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरूच राहणार आहे. तसचे, या मतदानाची मतमोजणीही उद्याच (18, डिसेंबर) होणार आहे.
म्हणून घेतला फेरमतदानाचा निर्णय
फेरमतदान होत असलेल्या मतदान केंद्रांवर 14 डिसेंबरला मतदान झाले होते. परंतु, निवडणुक आयोगाने तांत्रिक अडचणींचे कारण देत या ठिकाणी फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातचे मुख्य निवडणुक आयुक्त बी. बी. स्वेन यांनी वडगाम विधानसभा मतदार संघातील छानिया - 1 आणि छानिया- 2, विरमगाम मतदान केंद्रांवर बुथ क्रमांक 27, दस्करोई विधासभेतील नारोदा, सावलीतील नहारा -1, सकारदा-7 या मतदान केंद्रांवर मतदान घेतले आहे. पहिल्या टप्प्यातीलही 6 मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात आले होते. हे मतदान 14 डिसेंबरला पार पडले होते.
प्रचाराची प्रचंड रणधुमाळी
कधी नव्हे तो प्रचाराचा इतका धुरळा देशाने पाहिला. ज्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी तर झडल्याच. पण, व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप प्रचंड प्रमाणात झाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर, मॅरेथॉनस सभा घेतल्या. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही आपले जूने रूप बदलून नव्या दमाने विधानसभा निडणूकीत प्रचार केला. जो कॉंग्रेसससाठी नवसंजीवनी देणारा ठरू शकेल.