गांधीनगर :  गुजरातमध्ये विधानसभा (Gujarat Elections 2022) निवडणुकीची वारे वाहू लागले आहेत. एकूण 2 टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. निवडणुकीच्या या रणधुमाळीत नरेंद्र मोदी (Narendra Modi)  सरकारने मोठा डाव खेळला आहे.  गृह मंत्रालयाने (Home Ministrey) मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भाजपला या विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा होणार असल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे. (gujarat elections 2022 home ministrey give order to mehasana and anand collector about to given citizenship for who comed pakistan to india)


गुजरात निवडणुकीसाठी मोठी खेळी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाची फाळणी झाल्यानंतर अनेक हिंदु कुटंबिय (Hindu Family) पाकिस्तानातून भारतात विस्थापित झाले. मात्र स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही या विस्थापितांना भारताचं नागरिकत्व (Indian Citizenship) मिळालेलं नाही. केंद्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा नेमका हेरला. त्यानुसार गृह मंत्रालयाने आंनद आणि मेहसाणाच्या (Mehsana) जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहे. 


आवश्यक ती चाौकशी करुन पाकिस्तानातून भारतात विस्थापित झालेल्या हिंदुंना नागरिक्तव द्या, असे आदेशच गृह मंत्रालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे हा निर्णय हिंदु मतांवर डोळा ठेवून घेतल्याची चर्चा रंगली आहे.


मेहसाण्यातील ग्रामीण भागात एका वसाहतीला सहकार वसाहत असं नाव देण्यात आलं आहे.  या वसाहतीत एकूण 27 कुटुंबिय राहतात.  ही 27 कुटंब  पाकिस्तानातून विस्थापित होऊन आलेली आहेत. यातील काही कुटुंब 2017 तर काही 2019 साली आली आहेत. 


45 दिवसात व्हिजा 


सुरुवातीच्या 45 दिवसात यांना व्हिजा मिळतो. यानंतर 5 वर्षांसाठी लाँग टर्म व्हिजा मिळतो. त्यानंतर नाागरिकत्वासाठी अर्ज करता येतो. यासाठी हमी देण्यासाठी एका व्यक्तीची गरज लागते जो गॅरेंटर असतो. दरम्यान गृह मंत्रालयाच्या आदेशामुळे या हिंदु कुटुंबियांना लवकरच नागरिकत्व मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.