अहमदाबाद : मुसळधार पावसामुळे गुजरातमध्ये अक्षरशः पूरस्थिती निर्माण झाली आहे. अहमदाबाद, गांधीनगर, बनासकांठा, पाटण या आणि इतर भागांना या पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. यामध्ये आतापर्यंत १२३ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधी तुफानी पाऊस आणि त्यामुळे आलेला पूर यामुळे जनजिवन पुरतं उद्ध्वस्त झालं आहे. एकट्या अहमदाबादमध्येच गेल्या २४ तासांत तब्बल २०० मिलीमिटर पावसाची नोंद केली गेली. तर गांधीनगरमधल्या कलोल तालुक्यात सकाळी आठ ते दुपारी बारा या चार तासांमध्येच, २४० मिलीमिटर पाऊस नोंदवला गेला. 


यावरुनच तिथे काय पूरस्थिती ओढलवी असेल याचा अंदाज येऊ शकतो. धुवाधार पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासनानं शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर केली. तर एन डी आर एफची पथकं युद्धपातळीवर बचावकार्याचे काम करत आहेत.