अहमदाबाद: धो धो पैशांचा पाऊस कधी पडताना पहिला आहे का? हा पाऊस क्वचितच पडत असावा. गुजरातमध्ये असा पाऊस पाहायला मिळाला आणि तेही एका कार्यक्रमात. महिला स्टेजवर गात असताना एक व्यक्ती तिच्यावर पैशांचा पाऊस पाडतो. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातची फोक सिंगर उर्वशी रादादिया स्टेजवर गाण गाताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तिच्या डोक्यावर एक व्यक्ती पिंप भरून 500 रुपयांच्या नोटा ओततो. हा पैशांचा पाऊस तिच्यावर श्रोत्यांकडून पाडण्यात आला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल होत आहे. 


उर्वशी रादादियाच्या आजूबाजूला पाहिलं तर फक्त नोटाच नोटा दिसत आहेत. या नोटांमध्ये ती गात असल्याचं दिसत आहे. तिथे येणारा श्रोता तिच्यावर पैशांचा वर्षाव करत आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 



तुळशी विवाहच्या मुहूर्तावर भजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तुम्ही दाखवलेल्या या प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे आभार असं उर्वशी रादादियाने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.