Farmer : कांदा आणि बटाटा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, 270 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर
Onion and Potato Farmers :केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे कांद्या उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. शेतकरी अडचणीत आल्याने गुजरात सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कांदा उत्पादक आणि बटाटा उत्पादकांसाठी 270 कोटी रुपयांचं पॅकेज गुजरात सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांबाबत मोठी निर्णय कधी घेणार याकडे लक्ष लागले आहे.
Onion and Potato Farmers : गुजरात सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कांदा उत्पादक (onion farmers) आणि बटाटा उत्पादकांसाठी ( potato farmers) 270 कोटी रुपयांचं पॅकेज गुजरात सरकारने जाहीर केले आहे. गुजरात विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भुपेंद्र पटेल सरकारने ही मोठी घोषणा केली आहे. तेव्हा आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागले आहे ते गुरुवारी सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पाकडे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करतील. गुजरात सरकारने शेतकऱ्यांसाठी करुन दाखवलं आता शिंदे-फडणवीस सरकार राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार का याची उत्सुकता आहे. (Gujarat Government allocates Rs 270 crore for potato and onion farmers)
कांद्या उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका
केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे कांद्या उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. आता कांद्याच्या पडत्या भावांनंतर गुजरात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गुजरातमधील कांदा उत्पादकांसाठी 70 कोटींचं विशेष पॅकेज जाहीर केले आहे. तर बटाटा उत्पादकांनाही त्याहून मोठा दिलासा देण्याची घोषणा केली आहे. बटाटा उत्पादकांसाठी तब्बल 200 कोटी रुपयांचं पॅकेज घोषित केले आहे. गुजरात विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भूपेंद्र पटेल सरकारने ही घोषणा केली आहे. गुजरातने केले ते शिंदे-फडणवीस सरकार करणार का, ते शेतकऱ्यांना कधी दिलासा देणार? याकडे लक्ष लागले आहे. (Gujarat government's big decision for farmers, Rs 70 crore package for onion growers and Rs 200 crore package for potato growers)
गुजरात सरकारचा कांदा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय
गेल्या काही दिवसापासून कांदा आणि बटाटे उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव न मिळाल्याने ते मोठ्या अडचणीत आले होते. अखेर गुजरात सरकारने कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतला आहे. लाल कांद्याला बाजारभाव परवडणारा नसल्याने 70 कोटींची मदत दिली जाईल, अशी घोषणा कृषीमंत्री राघवजी पटेल यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी केली. यासोबतच वाहतूक सबसिडीही दिली जाणार आहे. याशिवाय राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
विशेष म्हणजे अहमदाबादसह राज्यभरातील 103 तालुके प्रभावित झाले आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तयार झालेल्या उभ्या पिकांत पाणी साचल्याने पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. जिरे, गहू, कापूस या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे.
शेतकऱ्यांना वाहतूक अनुदान दिले जाईल, अशी घोषणा कृषीमंत्री राघवजी पटेल यांनी विधानसभेत केली आहे. शेतकऱ्यांना 70 कोटींची मदत दिली जाणार आहे. प्रति शेतकरी कमाल 500 किलो मदत दिली जाईल. सरकार 2 रुपये प्रति किलो मदत देणार आहे. इतर देशांमध्ये बटाटे निर्यात करण्यासाठी 25 टक्के मदत दिली जाईल, असे ते म्हणाले.