नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर आले आहेत. या निकालांनुसार भाजपला दोन्ही राज्यांत स्पष्ट बहूमत मिळत असल्याचं दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच भाजपने आघाडी घेतल्याचं पहायला मिळालं. निवडणुकीत विजय आपलाच होणार हे भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिसताच सर्वत्र विजयाचं सेलिब्रेशन सुरु करण्यात आलं.



मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी ढोकळा आणि फाफडा या पदार्थांचे वाटप करुन विजय साजरा केला.



तर, मतमोजणीनंतर समोर येणारे आकडे पाहिल्यानंतर अहमदाबादमधील काँग्रेस कार्यालयात शुकशुकाट पहायला मिळालं.



दिल्लीमध्ये भाजपच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांनी निकालापूर्वीच आपल्या विजयाचा आनंद साजरा करत असल्याचं पहायला मिळालं.



दिल्लीतील भाजप मुख्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा करण्यासाठी एकच गर्दी केली होती.



हिमाचल प्रदेशातही शिमल्यातील भाजप मुख्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडत सेलिब्रेशन केलं.



यापूर्वी संसदेत पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निकाल जाहीर होण्यापूर्वीच विक्ट्री साईन दाखवलं.



केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रीया देत म्हटलं की, भाजप गुजरात आणि हिमाचल प्रदेशात बहुमताने सत्ता स्थापन करेल.



तर, काँग्रेसचे वरिष्ठ नेता अशोक गहलोत यांनी म्हटलं की, निकाल काहीही लागले तरी यश काँग्रेसनेच मिळवलं आहे.