अहमदाबाद : गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात ९३  जागांसाठी सकाळी आठपासून मतदान सुरुवात झालेय. एकूण ८५१ उमेदवार रिंगणात आहेत. पोलीस आणि निवडणूक आयोगाने चोख व्यवस्था ठेवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातमध्ये दुस-या टप्प्यातल्या मतदानाला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे.. ८५१ उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. या टप्प्यात जवळपास २ कोटी २२ लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.


प्रामुख्यानं शहरी भागात होत असलेल्या मतदानात अहमदबाद, बडोदा, मेहसाणा, बनासकांठा यासह एकूण १८ जिल्ह्यांचा समावेश आहे. मतदाना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतदारांना सकाळी ८ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.