सूरत: लॉकडाऊन आणि कोरोनामुळे आता मुलांना घराबाहेर खेळायला जाणंही बंद झालं आहे. तर दुसरीकडे ऑनलाइन शिक्षण असल्याने मुलं घरात कोंडल्यासारखी झाली आहे. मुलांच्या डोक्याला सतत काहीतरी नवीन काम देणं पालकांसाठी आव्हान आहे. त्यामुळे बरेचदा पालक हातात मोबाईल देऊन आपली सुटका अगदी सहज करून घेतात. मात्र हाच मोबाईल मुलाचा जीव घेऊ शकतो याची पुसटशी कल्पनाही पालकांना नसते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक थरारक प्रकार समोर आला आहे. चौथ्या मजल्यावर 2 वर्षांचा चिमुकला मोबाईलमध्ये पाहता पाहता थेट खिडकीतून खाली पडला. हा धक्कादायक प्रकार गुजरातमधील सूरत इथे घडला आहे. यावेळी त्याची आई बाथरूममध्ये होती. तो मोबाईल पाहता पाहता खिडकीतून थेट खाली कोसळला. 


अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. दैव बलत्तर म्हणून या चिमुकल्याला पडताना एका तरुणानं पाहिलं आणि त्याचा झेललं.या घटनेत चिमुकला जखमी झाला होता. त्याच्यावर 55 तास उपचार सुरू होते. मात्र त्याचा जीव वाचला नाही. पालकांनी एवढ्या लहान मुलांना डोळ्यात तेल घालून जपणं आवश्यक आहे. 


पालकांनी काय काळजी घ्यायला हवी?
- लहान मुलांना मोबाईल देऊन कामात व्यस्त होऊ नका
- घरातील खिडक्या ओपन असतील तर त्यांना ग्रील्स लावून घ्या, किंवा सुरक्षा कठडा करून घ्या
- घरातील पायऱ्यावरून देखील मुलं पडण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा ठिकाणी मुलांना एकटं सोडू नका
- लहान मुलं खूप उद्योग करत असतात त्यामुळे त्यांना एकटं सोडू नका
- घरातील जड सामनापासून त्यांना दूर ठेवा


ही घटना पालकांनी दुर्लक्ष केल्यानं घडली आहे. तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांना एकटं सोडून जाऊ नका नाहीतर तुमच्या मुलाचा जीवही धोक्यात जाऊ शकतो. त्यामुळे सतर्क राहा आणि काळजी घ्या असं आवाहन या मृत चिमुकल्याचा पालकांनी केलं आहे.