गांधीनगर : पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी गुजरातमध्ये मोठा बदल झाला आहे. नवीन मंत्रिमंडळाने गुरुवारी शपथ घेतली. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात एकूण 24 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे, त्यापैकी 10 कॅबिनेट मंत्री आहेत आणि उर्वरित 14 राज्यमंत्री झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष बाब म्हणजे शपथविधीपूर्वी विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण लवकरच त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. राजेंद्र त्रिवेदींच्या जागी आता निमा आचार्य यांना विधानसभेचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.


गुजरात सरकारमध्ये आता मुख्यमंत्र्यांसह एकूण 25 मंत्री आहेत.


कॅबिनेट मंत्री
1. राजेंद्र त्रिवेदी
2. जितेंद्र वाघानी
3. हृषिकेश पटेल
4. पूर्णाश कुमार मोदी
5. राघव पटेल
6. उदयसिंह चव्हाण
7. मोहनलाल देसाई
8. किरीट राणा
9. गणेश पटेल
10. प्रदीप परमार


राज्यमंत्री
11. हर्ष संघवी
12. जगदीश ईश्वर
13. ब्रिजेश मेरजा
14. जितू चौधरी
15. मनीषा वकील
16. मुकेश पटेल
17. निमिषा बेन
18. अरविंद रयानी
19. कुबेर धिंडोर
20. कीर्ती वाघेला
21. गजेंद्र सिंह परमार
22. राघव मकवाना
23. विनोद मरोडिया
24. देवाभाई मालव


गुजरातच्या नव्या मंत्रिमंडळात कोणत्याही जुन्या चेहऱ्याला स्थान देण्यात आलेले नाही. काही दिवसांपूर्वी विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री करण्यात आले. यापूर्वी बुधवारी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली होती, परंतु अनेक मंत्र्यांच्या नाराजीमुळे शपथविधी पुढे ढकलण्यात आला होता.


उपमुख्यमंत्री नितीन पटेल या मंत्रिमंडळाचा भाग राहतील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण जेव्हा विभागांचे विभाजन होईल, तेव्हाच ते उघड होईल. मुख्यमंत्री न केल्याने नितीन पटेल नाराज असल्याचे सांगण्यात आले. पण मंत्रिमंडळाच्या शपथविधीवेळी ते मंचावर उपस्थित होते.