हृदयद्रावक! पुराच्या पाण्यात डोळ्यांसमोरून वाहून गेली गाई-वासरे
नवेली नदीचे पाणी शिरल्यामुळे संपूर्ण परिसराला पाण्याचा वेढा पडला आहे.
अहमदाबाद: सध्या महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा फटका बसताना दिसत आहे. पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. त्यामुळे अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
गुजरातच्या अमरेलीमध्येही हीच परिस्थिती उद्भवली आहे. नवेली नदीचे पाणी शिरल्यामुळे संपूर्ण परिसराला पाण्याचा वेढा पडला आहे. यामधून माणसांनी उंचावरचे ठिकाण गाठून कसाबसा आपला जीव वाचवला. मात्र, मुकी जनावरे या पुराला बळी पडत आहेत. सध्या सोशल मीडियावर येथील एका घटनेचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
यामध्ये पुराच्या पाण्यात डोळ्यांदेखत गायी-वासरे वाहून जाताना दिसत आहेत. अनेक मोठ्या गायी आणि बैल ताकद लावून पाण्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पाण्याच्या प्रचंड वेगामुळे ही जनावरे वाहून गेली आहेत.
गावातल्या घरात आणि दुकानांमध्ये शिरलंय. या पूरस्थितीमुळे अमरेलीमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.