Gujrat Election 2022 : निवडणूक प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असतात, पण गुजरात निवडणुकीत व्यक्तिगत आरोपांची चिखलफेक सुरु झालीय. पंतप्रधान मोदींवर (PM Modi) टीका करताना काँग्रेस (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी (Mallikarjun Kharge) मोदींची तुलना थेट दहा तोंडाच्या रावणाशी केली.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात प्रचारादरम्यान मोदींवर व्यक्तिगत आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अगदी 2002 पासून मोदींवर गुजरात निवडणुकीदरम्यानच व्यक्तिगत टीका झालेली आहे.


मोदींवर व्यक्तिगत आरोप का? 


मौत का सौदागर - सोनिया गांधी


नीच आदमी - मणिशंकर अय्यर


मोदींची लायकी - मधुसूदन मिस्त्री


मोदी म्हणजे रावण - मल्लिकार्जुन खरगे


चौकीदार चोर हैं - राहुल गांधी


काँग्रेसच्या या बोचऱ्या टीकेवर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रांनीही (Sambit Patra) पलटवार केलाय. हा मोदींचा नाही तर गुजरातचा अपमान असल्याचं पात्रा म्हणालेत..


पंतप्रधान मोदींवर जेव्हा जेव्हा व्यक्तिगत टीका होते तेव्हा तेव्हा काँग्रेसला त्याचा जबरदस्त फटका बसतो हे अनेक निवडणुकांमधून दिसलंय. तरीही काँग्रेसचे दिग्गज नेते यातून धडा घेताना दिसत नाहीयेत, उलट मोदींवरच्या शेलक्या टीकेचा आपल्याला फायदाच होईल असाच त्यांचा सूर आहे. आता 8 डिसेंबरला गुजरातचा फैसला येईल तेव्हा मोदींवरच्या या टीकेचा काँग्रेसला फायदा होतो की तोटा हे समजेलच..


गुजरात विधानसभा निवडणूक
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. एकूण 182 जागांसाठी मतदान होणार असून पहिल्या टप्प्यात 89 तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. 2017 गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला 99 तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. भाजपने यंदा तब्बल 42 आमदारांना उमेदवारी नाकारली आहे, विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनाही तिकिट दिलेलं नाही.


गुजरात मतदानासाठी महाराष्ट्रात सुट्टी
महाराष्ट्रातील पालघर, नाशिक, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांत गुजरात निवडणुकीसाठी 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबरला सार्वत्रिक सुटी जाहीर केलीय. विशेष म्हणजे मतदानासाठी नोकरदार वर्गाला भरपगारी रजा दिली जाणार आहे. गुजरात निवडणुकीसाठी  महाराष्ट्रात सुट्टी दिल्याचा राज्याच्या इतिहासातील हा पहिलाच निर्णय आहे.