गुजरात विधानसभा निवडणुक: भाजपाची पहिली यादी 17 नोव्हेंबरला होणार जाहीर
गुजरात निवडणुकीसाठी भाजपाची पहिली यादी 17 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.
गुजरात : गुजरात निवडणुकीसाठी भाजपाची पहिली यादी 17 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.
पहिल्या यादीमध्ये 89 जणांची घोषणा होईल असा अंदाज आहे. राज्यातून 182 जागांपैकी 70 जागांसाठी प्रत्येकी एका उमेदवाराचं नाव देण्यात आलंय, तर उर्वरित जागांसाठी 2 किंवा 3 नावं चर्चेत आहेत.
उद्या दिल्लीमध्ये होणाऱ्या संसदीय दलाच्या बैठकीमध्ये या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. निश्चित झालेल्या नावांवरून मुख्यमंत्री विजय रुपानी राजकोट पश्चिम मतदारसंघातून तर उपमुख्यमंत्री नितीन पटेल मेहसाणा इथून निवडणूक लढवतील, अशी शक्यता आहे. मात्र उद्याच्या दिल्लीतल्या बैठकीनंतरच यावर शिक्कामोर्तब होऊ शकेल.