`या` आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, भाजपात प्रवेश करण्याची शक्यता
विधानसभा अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. आता ते भाजपमध्ये (Bjp) जाण्याची शक्यता आहे.
Harshad Ribadiya Resign : गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी (Gujarat Assembly Election 2022) राज्यात काँग्रेसला (Congress) आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे आमदार आणि पाटीदार समाजाचे नेते हर्षद रिबडिया (Harshad Ribadiya Resign) यांनी मंगळवारी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. आता ते भाजपमध्ये (Bjp) जाण्याची शक्यता आहे. (gujrat congress harshad ribadia resigns mla post likely to join bjp)
जुनागढ जिल्ह्यातील विसावदार विधानसभा मतदारसंघातील विरोधी पक्षाचे काँग्रेस आमदार हर्षद रिबडिया यांनी मंगळवारी रात्री उशिरा सभापती निमाबेन आचार्य यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. रिबडिया यांचा राजीनामा सभापतींनी स्वीकारला, कारण त्यांना खात्री होती की त्यांनी स्वत:च्या इच्छेने आणि कोणतीही जबरदस्ती न करता राजीनामा दिला आहे, असं गुजरात विधानसभेने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलंय.
पाटीदार समाजाचे नेते रिबडिया हे 2017 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर पटेल समुदायाच्या जागेवरून निवडून आले होते. रिबडीया यांनी गेल्या साडेचार वर्षात भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. रिबडिया लवकरच सत्ताधारी पक्षात सामील होण्याची शक्यता भाजपच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. मात्र रिबडिया यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान वर्षाच्या अखेरीस गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.