गुजरात : गुजरातमध्ये राजकीय पक्षांनी प्रचारासाठी विविध युक्त्या लढवल्या आहेत. भाजपनं प्रचारासाठी गुजरातचं सांस्कृतिक नृत्य आणि गाण्यांचा आधार घेतलाय.


सांस्कृतिक नृत्याचा आधार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या राजकोट पश्चिम मतदारसंघात अशाच सांस्कृतिक नृत्याच्या आधारे भाजपचा प्रचार सुरू आहे. 


प्रचार अंतिम टप्प्यात 


 गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय. उद्या म्हणजे सात तारखेला संध्याकाळपर्यंत प्रचाराची मुदत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप दोन्ही बाजूंनी प्रचारासाठी आपली सगळी ताकद उतरवलीय.


राहुल गांधी गुजरातमध्ये दाखल


काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी कालच गुजरातमध्ये दाखल झाले. पण पावसामुळे त्यांना एकच सभा घेता आली. त्यांच्या आजच्या सभा रद्द करण्यात आल्या.


प्रचाराची रणधुमाळी 


पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पुन्हा गुजरातमध्ये येत आहेत. मोदींची सुरतमध्ये सभा होतेय. याशिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, माहिती प्रसारण मंत्री स्मृती इराणी, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्या टप्प्यातल्या मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या रणधुमाळीत उतरत आहेत.