यंदाची गुजरात निवडणूक या ५ कारणांमुळे आहे वेगळी
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. राज्यात दोन टप्प्यांत मतदान केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 9 डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. 18 डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशसह गुजरात निवडणूक निकालाची घोषणा होईल. यंदाची गुजरात निवडणूक थोडी वेगळी असणार आहे. जाणून घ्या काय आहेत त्या ५ गोष्टी.
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. राज्यात दोन टप्प्यांत मतदान केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 9 डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. 18 डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशसह गुजरात निवडणूक निकालाची घोषणा होईल. यंदाची गुजरात निवडणूक थोडी वेगळी असणार आहे. जाणून घ्या काय आहेत त्या ५ गोष्टी.
1. 15 वर्षांत प्रथमच, गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर न ठेवता निवडणुका होत आहेत.
2. यावेळी भाजपने राज्यातील 182 जागांपैकी 150 जागांवर विजय मिळविण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. गुजरातमध्ये 149 जागा जिंकण्याचा रेकॉर्ड आहे. 1985 मध्ये माधवसिंग सोलंकी यांनी 149 जागा जिंकल्या होत्या. भाजपाला हा रेकॉर्ड मोडून काढायचा आहे. 2014 च्या उत्तरप्रदेशमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने 80 पैकी 73 जागा जिंकल्या होत्या तर विधानसभेच्या 403 पैकी 325 जागा जिंकल्या होत्या. 2014 मध्ये भाजपने गुजरातमध्ये सर्व 26 लोकसभा जागांवर विजय मिळवला. याच विश्लेषणावर आधारित, भाजपला 150 जागांवर विजय मिळविण्याचं लक्ष्य आहे.
3. गेल्या 22 वर्षांच्या सत्तेच्या काळात प्रथमच पाटीदार, दलित, ओबीसी समाजाच्या उद्रेकाचा सामना करावा लागला आहे. हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी आणि अल्पेश ठाकूरने काँग्रेसच्या बाजुने झुकतांना दिसत आहे. पाटीदार समाजातही आता फूट पडली आहे. त्यांचे २ नेते आता भाजपमध्ये आले आहेत.
4. जीएसटी लागू केल्यानंतर गुजरात आणि हिमाचलप्रदेशात सरकारची पहिली अग्निपरीक्षा होणार आहे. विरोधक नोटबंदी आणि जीएसटीवरुन केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत भाजपला निवडणुका जिंकण्याचं आव्हान असणार आहे.
5. अनेक वर्षांनंतर, गुजरातमध्ये, काँग्रेस प्रथमच निवडणुकीत जोरादारपणे उतरली आहे. सोशल मीडियावर त्यांची मोहिम विकास पागल झाला आहे ही चांगलीच चर्चेत आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत अहमद पटेल यांचा विजय झाल्याने, काँग्रेसला राज्यात नवीन संजीवनी मिळाली. राहुल गांधी देखील या निवडणुकीत गुजरातमध्ये आक्रमकपणे दिसत आहेत.