मणिपूर निकाल : लंडन रिटर्न उमेदवार श्वेता ब्रम्हभट्टचा भाजपकडून पराभव
गुजरात विधानसभा निवडणूकीत पुन्हा एकदा भाजप अग्रस्थानी असल्याचे स्पष्ट.
मुंबई : गुजरात विधानसभा निवडणूकीत पुन्हा एकदा भाजप अग्रस्थानी असल्याचे स्पष्ट.
यावेळी सगळ्यांच्या नजरा या मणिनगरच्या जागेवर होती. या जागेवरून कधीकाळी आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः लढले होते. पंतप्रधान मोदींच्या या लोकप्रिय जागेवरून यंदा काँग्रेसने लंडन रिटर्न महिला उमेदवार श्वेता ब्रम्हभट्टला उमेदवारी दिली होती. मात्र श्वेता यामध्ये अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे मोदींच्या घरात घुसून त्यांना हरवण्याचा प्रयत्न काँग्रेसचा अपयशी ठरला आहे. मणिनगर जागेवर भाजपचे सुरेश पटेल यांना ११५६१९ इतके मत मिळाले असून IIM मधून MBA करून आलेली काँग्रेसची उमेदवार श्वेता ब्रम्हभट्टला फक्त ४०,५३६ मत मिळाले आहेत.
पॉलिटिक्स ट्रेनिंग करून आलेली श्वेता
गुजरात विधानसभा निवडणूकीत ३४ वर्षाची असलेली श्वेता ही एकमेव अशी उमेदवार आहे जिने राजकारणाचे प्रशिक्षण घेतले होते. आणि ते देखील प्रतिष्ठित अशा भारतीय प्रबंधन संस्था म्हणजे IIM मधून. त्यांचे वडिल नरेंद्र ब्रम्हभट्ट शहराचे ज्येष्ठ काँग्रेस नेता आहेत. श्वेताला पूर्ण विश्वास होता की ती आपले विचार आणि दृढ संकल्पाच्या जोरावर यश संपादन करेल. मात्र हे चित्र मणिनगरमध्ये पाहता आले नाही. हे चित्र भाजपाच्या बाजूने लागले याचे मुख्य कारण आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राज्य मुख्यालय हे इथेच आहे. १९९० मध्ये मणिनगर हे भाजपचा गढ समजला जात होता. ज्यामध्ये घुसून विजय मिळवणं पूर्णपणे कठिण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००२, २००७ आणि २०१२ मध्ये या क्षेत्राचे प्रतिनिधित्व केलेले आहे. या अगोदर १९९० ते १९९८ मध्ये भाजप नेता कमलेश पटेल यांनी ही जागा मिळविली होती.
श्वेताने या अगोदर मोदींकडून पराजय स्विकारला
२०१२ मध्ये मोदींनी आपली विरोधी उमेदवार श्वेता ब्रम्हभट्टला ८६ हजार मतांच्या अंतराने हरवलं होतं. श्वेताचे पती हे आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांची पत्नी आहे. २०१४ मध्ये प्रधानमंत्री या पदावर मोदी विराजमान झाल्यानंतर या जागेचा त्यांनी राजीनामा दिला आहे.