Gujarat Boat Capsize : गुजरातच्या बडोद्यात हर्णी इथं सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची तलावात बोट उलटून 14 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेने गुजरातसह संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. एकूण 23 विद्यार्थी आणि चार शिक्षक हर्णी इथं सहलीसाठी आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी हर्णी तलावात नौका विहार करण्याचा हट्ट धरला. विद्यार्थ्यांच्या हट्टापुढे शिक्षकही मनाई करु शकले नाहीत. सर्व विद्यार्थी आणि टीचर एकाच बोटीत चढले. या बोटीची क्षमता 16 लोकांची असताना यात 31 जणांना बसवण्यात आलं. म्हणजे बोटीतून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवास करत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बडोद्यातील (Vadodara) सनराईज शाळेचे हे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक होते. गुरुवारी शाळेचे चार शिक्षक आणि 23 विद्यार्थी हर्णी तलावाजवळ सहलीसाठी आले. बोटीत 23 विद्यार्थी, 4 शिक्षक, बोट चालक आणि आणखी चार लोकं होती. बोटिंग करताना तलावात बोट उलटली आणि 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर दोन शिक्षकांनीही जीव गमावला. नऊ विद्यार्थी आणि 2 शिक्षकांना वाचवण्यात आलं. त्यांच्यावर बडोद्यातील SSG रुग्णालयात उपचार सुरु आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचं एक पथक यासाठी तैनात करण्यात आलं आहे. 


सेल्फीचा हट्ट जीवावर बेतला
बोट तलावाच्या किनारी परतत असताना विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे सेल्फीचा (Selfie) हट्टा धरला. सेल्फी काढण्यासाठी सर्व विद्यार्थी बोटीच्या एका बाजूला आले, त्यामुळे बोटीच्या एका बाजूला सर्व वजन पडलं आणि बोट एका बाजूने तलावात कलू लागली. यामुळे विद्यार्थी घाबरले आणि त्यांनी आरडाओरडा सुरु केला. पण अचानक बोट तलावात उलटली. किनाऱ्या जवळ असलेल्या लोकांना आरडाओरडा सुरु केल्यानंतर स्थानिक लोकांनी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. हर्णी तलाव व्यवस्थापनाला याची माहिती देण्यात आली. 


तर जीव वाचला असता
मिळालेल्या माहितीनुसार 2020 मध्ये हर्णी झील तलावात बोटिंग बंद करण्याची नोटीस देण्यात आलीहोती. पण यानंतरही इतं बोटिंग सुरुच होती. धक्कादायक म्हणजे 31 लोकांपैकी केवळ 10 जणांना लाईप जॅकेट घालण्यात आलं होतं. सर्वांना लाईप जॅकेट दिलं असतं तर कदाचीत सर्व विद्यार्थ्यांचा जीव वाचला असता. 


दोषींवर कठोर कारवाई होणार
बडोद्याच्या खासदार रंजनबेन भट्ट यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं सांगितलंय. तर गुजरातचे मंत्री कुबेर डिंडोर यांनी शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापकांना दुर्घटनेसाठी जबाबदार धरलं आहे. आरोग्यमंत्री रुशिकेश पटेल यांनी दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.