गुडगाव : गुडगावच्या नामी-गिरामी मॉलमधील एका स्पा सेंटरमध्ये देह व्यापार चालत असल्याच्या आरोपाखाली ९ महिल्यांना गुडगाव पोलीसांनी अटक केली आहे. यात थायलॅंडच्या ४ महिलाही सहभागी आहेत. पोलीसांनी सांगितले की, या महिला मसाज देण्याच्या नावाखाली देहव्यापार करत होत्या. त्या एमजी रोड वरील मॉलमध्ये नेचर स्पा मध्ये काम करत होत्या. पोलीसांचे जनसंपर्क अधिकारी रविंद्र कुमार यांनी सांगितले की, या महिलांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


असा केला पर्दाफाश


पोलीस कान्स्टेबल या स्पा मध्ये ग्राहक बनून गेला आणि तेथील रिसेप्शनिस्ट आणि कान्सटेबलमध्ये २५०० रुपयांचा सौदा झाला. त्यानंतर पोलीसांनी स्पा मध्ये छापा घातला आणि आरोपी महिलांना अटक केली.