चंदीगड : दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याची प्रकृती बिघडलीय, असं सांगण्यात येतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर, गुरमीतच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रोहतकहून डॉक्टरांची एक टीम तुरुंगात दाखल झाली. यानंतर गुरमीतला हॉस्पीटलमध्ये हलवण्यात येऊ शकतं, असं सांगण्यात येतंय. 


गुरमीतला दोन बलात्कार प्रकरणी १० - १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा मिळालीय. तो सध्या रोहतकच्या सुनरिया तुरुंगात आहे. 


याच दरम्यान गुरमीतच्या डेऱ्यातही पोलीस दाखल झालेत. डेऱ्यात अवैध फटाक्यांची फॅक्टरी सुरू होती, हेदेखील आता समोर आलंय. या फॅक्टरीला आता सील ठोकण्यात आलंय. शिवाय डेऱ्यात प्लास्टिक करन्सीही मोठ्या प्रमाणात सापडलीय. सर्च टीमनं डेऱ्यातून कम्प्युटर, लॅपटॉप आणि हार्डडिस्क ताब्यात घेतलेत. यामुळे, गुरमीतच्या अनेक काळ्या धंद्यांचा पर्दाफाश होऊ शकतो.