नवी दिल्ली: डेरा सच्चा सौदाचा माजी प्रमुख गुरमीत राम रहीम आणि त्याची मानलेली मुलगी हनीप्रित यांचे कारागृहातील जीवन कसे आहे याबबत नुकतीच माहि्ती पुढे आली आहे. एके काळी ऐशोआरामाचे जीवन जगलेले हे दोघेही सध्या कारागृहात आहेत. कारागृहातील जीवनाची दोघांनीही सवय करून घेतली आहे. पण, कारागृहात असूनही हे दोघे अद्यापही लोकांच्या चर्चेचा आणि प्रसारमाध्यमांमध्ये बातम्यांचा विषय होतत. कारागृहातील भजन किर्तनापासून हनीप्रित स्वत:ला दूर ठेवते. इतर कैद्यांसोबत ती अपवादानेच बोललेली आढळते. तर, दुसऱ्या बाजूला गुरमीत राम रहीम हासुद्धा एकाकी जीवन जगतो. प्रतिदिन २० रूपये अशी त्याची कमाई आहे.


कारागृहात हनीप्रित एकटी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाव जाहीर न करण्याच्या अटीवर कारागृहातील सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने वृत्त दिले आहे. या वृत्तात, गुरमीत राम रहिम आणि हनीप्रित यांच्या कारागृहातील जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. म्हटले आहे की, कारागृहात हनिप्रीत एकटे राहणे पसंद करते. कारागृहातील भजप किर्तनात तिला काडीचाही रस नसतो. सुरूवातीला तिला कारागृहातील जेवन चांगले लागत नसे. त्यात कारागृह प्रशासनही तिला घरून जेवन देण्यास मदत करते असा आरोप होत होता. पण, प्रसारमाध्यमांतून बातम्या येताच हनीप्रितचे घरचे जेवन बंद झाले असून, तिला कारागृहातील जेवनच घ्यावे लागत असल्याची माहिती आहे. आता तिला कारागृहातील जेवनावर कोणातही आक्षेप नसतो. ती एक वेगळ्या प्रकारची कैदी असल्यामुळे तिला हव्या त्या प्रकारचे कपडे वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुले न्यायालयात जातानाही तिला डिजायनर कपडे वापरताना तुम्ही पाहण्याची शक्यता आहे. हनीप्रितला अंबाला मद्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.


राम रहीम कमावतो प्रतिदिन २० रूपये


दरम्यान, दोन साध्विंवर बलात्कार केल्या प्रकरणी राम रहीम सुनारिया कारागृहात २० वर्षे कारावासाची शिक्षा भोगत आहे. कारागृहात त्याला कैद्यांचे कपडे देण्यात आले आगहेत. कारागृहात राम रहीम शिस्तपालन विभागात काम करतो. राम रहीमला अद्यापही कारागृहातील शिकाऊ कामगार म्हणूनच ओळखले जाते. कारागृहात त्याचे वर्तन चांगले असल्याचे सांगितले जाते. तो दिवसाकाटी २० रूपये कमावतो. आतापर्यंत सहकारी कैद्यांनी त्याला कारागृहातील शेतात भाज्या पिकवताना पाहीले आहे. पांढरा कुर्ता आणि पायजम्यात वावरणाऱ्या राम रहिमच्या दाढीचे आणि अंगावरील केस तांबडे झाले आहेत. त्याला नुकतीच त्याची आणि आणि मुलगा भेटायला आले होते. 


कारागृह प्रशासनाने त्याच्या खात्यावर प्रतिमहिना ५००० रूपये जामा करण्याची सवलत दिली आहे. या पैशातून त्याला कारागृह उपहारगृहातून फळे, समोसा, स्नॅक्स अशा प्रकारच्या गोष्टी घेता येऊ शकतात.