राम रहिमच्या कपड्यांची चोरी
कधीकाळी डेरा सच्चा सौदावर राज्य करणाऱ्या राम रहिमवर खूप वाईट दिवस आले आहेत. बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या राम रहिम ला भाजीपाला उत्पादन, बागायतकाम करायला लागत आहे. पण दुसरीकडे त्याच्या राहत्या घरून त्याचे कपडे चोरांनी लंपास केले आहेत.
चंढीगड : कधीकाळी डेरा सच्चा सौदावर राज्य करणाऱ्या राम रहिमवर खूप वाईट दिवस आले आहेत. बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या राम रहिम ला भाजीपाला उत्पादन, बागायतकाम करायला लागत आहे. पण दुसरीकडे त्याच्या राहत्या घरून त्याचे कपडे चोरांनी लंपास केले आहेत.
चंढीगड येथील डबोडा गावात राम रहिमच्या 'चर्चा' घरात त्याचे कपडे ठेवण्यात आले होते. त्याचे अंध भक्त त्या कपड्यांची पुजाही करत असत. पण शनिवारी त्याच्या घरात काही चोर घुसले आणि काही किंमती सामान आणि त्याचे कपडे घेऊन पसार झाले. भक्त जयपाल याने बहादूरगड पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार नोंदविली आहे. चोरांनी कपड्यांसहीत सीसीटीव्ही कॅमेरेही सोडले नाहीत. हार्ड डिस्क, डिव्हीआर सिस्टीम, संगणक आणि इतर किंमती वस्तूही यात गहाळ झाल्याचे तक्रारी म्हटले आहे.
त्याच्या इतर व्हिआयपी घरातील लग्जरी रूममधील किंमती सामानही चोरांनी लंपास केले आहे.
'चर्चा' घराला पोलिसांनी टाळे ठोकले होते. जयपाल त्याच्या घराची देखभाल करीत असे. दरवाजाचे टाळे तुटल्याचे दिसल्यावर जयपालला संशय आला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.