Guru Nanak Jayanti 2022 Holiday: आज  जगभारात गुरु नानक जयंती (Guru Nanak Jayanti 2022) साजरी केली जाणार आहे.याच पार्श्वभूमीवर काही बँका बंद (Bank Holiday) असणार आहेत तर काही बँकांना सुट्टी नसणार आहे. तसेच दिवाळीनंतर आता नोव्हेंबर महिन्यात देशभरातील बँका जवळपास 10 दिवस बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या नियमांनुसार  ही माहिती मिळाली असून 30  दिवसांच्या नोव्हेंबर महिन्यात अनेक सण आहेत. त्यामुळे बँकांना सुट्ट्या असतील. (november bank holidays 2022)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'या' शहरांमधील बँकांना सुट्टी


8 नोव्हेंबरला गुरु नानक जयंती (Guru Nanak Jayanti 2022) असून अनेक राज्यांमध्ये बँका बंद (Bank Holiday) राहतील. यामध्ये आयझॉल, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला आणि श्रीनगर येथील बँका गुरु नानक जयंती दिवशी बंद राहतील. 


मात्र त्रिपुरा, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, सिक्कीम, आसाम, मणिपूर, केरळ, गोवा, बिहार आणि मेघालय या राज्यांमध्ये बँका बंद राहणार नाहीत. 


या महिन्यात 10 दिवस बँका बंद


तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) यादीनुसार बँकेच्या सुट्ट्या निश्चित होत असतात. त्या यादीनुसार नोव्हेबर महिन्याच्या सुट्ट्यांची संख्या 10 ठेवण्यात आली आहे. यामध्ये दुसरा आणि चौथा शनिवार तसेच महिन्याच्या प्रत्येक रविवारचा समावेश होतो. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी बँका नेहमीप्रमाणे सुरू असतील.


वाचा : 'या' लोकांसाठी मंगळवारचा दिवस असेल स्पेशल, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य


दुसरा शनिवार, रविवार व्यतिरिक्त RBI ने 8, 11 आणि 23 नोव्हेंबरला सुट्टी जाहीर केली आहे. भारतातील बँका 11 नोव्हेंबर  2022 रोजी म्हणजे शुक्रवारी कनकदास जयंती/वंगाळा उत्सवानिमित्त बंद आहेत. या दिवशी फक्त कर्नाटक, मेघालयमध्ये बँका बंद असतात. इतर राज्य बँका काम करतील.


नोव्हेंबरमध्ये अनेक सण


नोव्हेंबर महिन्यात गुरु नानक जयंती (Guru Nanak Jayanti 2022), कार्तिक पौर्णिमा (Kartik Purnima 2022 ), रहस पौर्णिमा, कनकदास जयंती, वांगला उत्सव, कन्नड राज्योत्सव, कुट उत्सव आणि सेंग कुत्सानेम यांसारखे सण आहेत. कारण यातील बहुतांश सण हे प्रादेशिक आहेत. त्यामुळे या विशेष दिवशी भारतातील बहुतांश बँका खुल्या राहतील. ज्या राज्यांमध्ये हे प्रादेशिक सण साजरे केले जातात, त्याच बँका एकाच वेळी बंद राहतील.