गुरुग्राममध्ये दुसऱ्या इयत्तेतल्या प्रद्युम्न ठाकूर याची हत्या केल्याची कबुली  आरोपी बस कंडक्टर अशोकने दिली आहे. टॉयलेटमध्ये गैरवर्तन करत असल्याचे प्रद्युम्ननं पाहिलं होतं. त्यामुळेच घाबरुन त्याची गळा चिरुन हत्या केल्याची कबुली अशोकनं दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोहना भागातल्या रायन इंटरनॅशनल शाळेतल्या टॉयलेटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात प्रद्युम्नचा मृतदेह आढळला होता. 


या घटनेनंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळलीय. संतप्त पालकांनी शाळेसमोर जोरदार आंदोलन केलं. मृत प्रद्युम्नच्या वडीलांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केलीय. बस कंडक्टरला शाळेच्या आत जाण्याची परवानगी कुणी दिली.


शाळेच्या आत त्याच्याकडे चाकू कसा आला असे सवाल आंदोलक पालकांनी उपस्थित केलेत. तर शाळा प्रशासनाविरोधातही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.