Gyanvapi Masjid : कोर्ट कमिश्नर अजय मिश्रा यांना हटवलं, मुस्लीम पक्षाचा होता आक्षेप
ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा वाद आणखी वाढला आहे.
Gyanvapi Masjid Updates : ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यावर आज वाराणसी न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाच्या आयुक्तांनी अहवाल सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली होती. दुसरीकडे, मशीद कमिटीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वेक्षणाचा आदेशच अन्यायकारक असल्याचे मुस्लीम पक्षाचे म्हणणे आहे.
आज वाराणसी हायकोर्टाने कोर्टाकडून नियुक्त कमिश्नर अजय मिश्रा यांना हटवलं आहे. त्यांच्या जागी आता विशाल सिंह हे अहवाल सादर करणार आहे. तर अजय मिश्री हे त्यांना या कामात मदत करणार आहेत.
ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा वाद आणखी वाढला आहे. मशिदीच्या आवारात शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू बाजूने केला जात आहे, तर मुस्लिम बाजूने ते शिवलिंग नसून कारंजे असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावर आज वाराणसी न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयीन आयुक्तांनी पाहणी अहवाल सादर करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत मागितली होती. न्यायालयाने ही वेळ दिली आहे.
न्यायालयाचे आयुक्त अजय मिश्रा यांना हटवण्यात आले आहे. अजय मिश्राचा सहकारी आरपी सिंह मीडियाला माहिती लीक करत असल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय मुस्लिम पक्षाने अजय मिश्रा यांना हटवण्याची मागणीही केली होती. त्याच वेळी, अजय प्रताप सिंग आणि विशाल सिंग हे सर्वेक्षण टीमचा भाग राहतील.