Gyanvapi Masjid : ज्ञानवापी मशिदीतील वातावरण तापत चालले आहे. आज सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात सुनावणी होणार आहे. दुसरीकडे ज्ञानवापी मशिदीत शुक्रवारची नमाज अदा करण्यात आली, त्यामुळे तेथे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. आज या ठिकाणी गर्दी खूप वाढली होती. दरम्यान, अलाहाबाद हायकोर्टातही ज्ञानवापीशी संबंधित प्रकरणावर सुनावणी 6 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्ञानवापीमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. शुक्रवारच्या नमाजासाठी मोठी गर्दी जमली असून, त्यामुळे ज्ञानवापी मशीद फुल झाली आहे. सध्या मौलवी नमाज पठणासाठी आलेल्या लोकांना दुसऱ्या मशिदीत जाण्यास सांगत आहेत.



ज्ञानवापी मशिदीचा वाद तापला असताना आज नमाजासाठी मोठी गर्दी झाली. आधी ३० लोक नमाज अदा करत असल्याची माहिती होती, पण आता ७०० जण मशिदीत पोहोचल्याचे बोलले जात आहे. यानंतर मशिदीचे गेट बंद करण्यात आले आहे.


ज्ञानवापी याचिकेवर आज दुपारी 3 वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. येथे मुस्लीम पक्षाने वाराणसी कोर्टाने केलेल्या सर्वेक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल केली आहे. हिंदू पक्षाने याला विरोध केला आहे. या प्रकरणाची काल सुनावणी झाली ज्यात हिंदू पक्षाने उत्तर दाखल करण्यासाठी आणखी वेळ मागितला होता. आता हे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे.