नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील भोपाल विभागात येणाऱ्या हबीबगंज रेल्वे स्टेशनचे नाव राणी कमलापती रेल्वे स्टेशन झाले आहे. हे वर्ल्ड क्लास सुविधांनी युक्त पहिले खासगी रेल्वे स्टेशन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 नोव्हेंबर रोजी राणी कमलापती रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करणार आहेत. भोपालच्या राणी कमलापती रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सोई सुविधा उपलब्ध होणार आहेत. हे देशातील पहिले ISO - 9001 सर्टिफाइड रेल्वे स्टेशन आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे स्टेशन भारतातील पहिली सर्टिफाइड ट्रेन शान ए भोपाल एक्सप्रेसचे हेडक्वॉर्टर देखील आहे. येथे अनेक लांब पल्ल्याच्या ट्रेनचा थांबा आहे. रेल्वेपर्यंत पोहचण्यासाठी प्रवाशांना एस्केलेटरची सुविधा उपलब्ध आहे.


प्रोजेक्टची किंमत 450 कोटी रुपये
पीपीपी मॉडेलवर पुनर्विकास झालेल्या रानी कमलापती रेल्वे स्टेशनला बंसल ग्रुप म्हणजेच खासगी कंपनीने तयार केले आहे. स्टेशनच्या विकासासाठी एकूण खर्च तब्बल 450 कोटी रुपये झाला आहे. खासगी भागीदारीवर विकास करण्यात आलेला हा भारतातील पहिला प्रकल्प आहे.



स्टेशनवर एअर कॉनकोर बनवण्यात आला आहे. ज्यामध्ये 700 प्रवाशी बसून ट्रेनची वाट पाहू शकतात.