मुंबई : माइक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर बुधवारी रात्री मोठा हल्ला झाला. ट्विटर कंपनीसाठी ही रात्र आव्हानात्मक होती. बराक ओबामा, बिल गेट्ससह अनेक मोठ्या व्यक्तींचे अकाऊंट हॅक झाले होते. त्यानंतर कंपनीने अनेक जणांचे अकाऊंट बंद केले होते. अकाऊंट हॅक केल्यानंतर हॅकर्सकडून बिटकॉइनच्या रुपात दान मागण्यात येत होतं. ट्विटने ही परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॅकर्सने अकाऊंट हॅक करुन, 'बिटकॉइनच्या रुपात दान करा आणि तुमचे पैसे दुप्पट करुन पुन्हा पाठवू.' असे ट्विट करण्यात आले होते.
आता वेळ आली आहे, आपण जे समाजाकडून कमवलं आहे. त्यांना ते परत करण्याची. अशा पद्धतीने बिटकॉइनच्या रुपात दान मागण्यात आले होते.


इतक्या मोठ्या प्रोफाइलवरुन ट्विट करण्यात आलं. म्हणजे लोकांना खरंच वाटलं. सायबर सेक्योरिटी हेड अल्पेरोविच यांनी म्हटलं की,सामान्य लोकांना काही प्रमाणात नुकसान झालं आहे. हॅकर्सने जवळपास 300 लोकांकडून 1 लाख 10 हजार डॉलर बिटक्वाईन काढले.


ज्याप्रकारे रुपये आणि डॉलर आहे. तसेच बिटकॉईन देखील आहे. ही एक डिजिटल करंसी आहे. जे डिजिटिल बँकेत ठेवले जातात. सध्या याला काही देशांमध्येच परवानगी देण्यात आली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी एका बिटकॉईनची किंमत खूप अधिक आहे. गुंतवणूक म्हणून लोकं यात गुंतवणूक करतात.


ट्विटरचे सीईओ जॅक यांच्याकडून सांगण्यात आलं की, आज ट्विटरसाठी आव्हानात्मक दिवस होता. हॅकिंगला रोखण्यासाठी प्रयत्न केला गेला. त्यासाठी अनेक अकाउंट्स बंद करण्यात आले. आता अकाऊंट पुन्हा सुरु झाले आहेत. पण यामागे कोण आहे याचा शोध सुरु आहे.


पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात मोठ्या व्यक्तींचे अकाऊंट हॅक करण्यात आले आहेत. अकाऊंट हॅक करुन बिटकॉईन मागणी पहिल्यांदाच झाली आहे.