New born baby care tips: बाळाची काळजी घेताना काही मूलभूत गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.  नवजात बाळाची त्वचा खूप मऊ असते.  त्वचेसोबतच बाळाचे केसही खूप मऊ असतात.  लहान मुलांच्या त्वचेची आणि केसांची काळजी घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांना  जाड, मऊ आणि निरोगी केस मिळण्यास मदत होते.


माईल्ड शाम्पू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाळाचे केस प्रौढांपेक्षा पाचपट पातळ असतात, त्यामुळे नवजात मुलांसाठी खास बनवलेला शाम्पू वापरणे आवश्यक आहे. केस आणि टाळू हळूवारपणे स्वच्छ करण्यासाठी, पॅराबेन्स, सल्फेट आणि कृत्रिम रंग नसलेले सौम्य शाम्पू वापरा.  बेबी केअर शाम्पू खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला या उत्पादनांबद्दल माहिती असणं आवश्यक आहे.


 नॅचरल हेअर ऑइल


रोजच्या वापरासाठी योग्य असे तेल निवडा कारण ते बाळाच्या टाळूला अतिशय सेन्सिटिव्ह बनवतं. अशा परिस्थितीत लहान मुलांना अशा तेलाने मसाज करणं आवश्यक आहे, जे केमिकल फ्री असतील शिवाय फार स्टिकी देखील नसेल 
अॅव्होकॅडो आणि प्रो-व्हिटॅमिन B5सर्टिफाईड  बेबी हेअर ऑइल आहेत जे केसांना रेशमी आणि निरोगी बनवतात. आपण नॅचरल हेअर ऑइलदेखील वापरू शकता.


 चांगला कंगवा


 जर मुलाचे केस जाड आणि कुरळे असतील तर त्यांचे केस गुंतू शकतात.  गुंता कमी करण्यासाठी, बाळाच्या केसांना मोठे दात असलेल्या, मऊ-ब्रश असलेल्या कंगव्याने हलक्या हाताने विंचरा कारण बाळाची टाळू खूप मऊ असते.  शॅम्पू केल्यानंतर ताबडतोब बाळाचे केस विंचरणं केव्हाही चांगले