एचएएलचे २० हजार कर्मचारी बेमुदत संपावर
एचएएलमध्ये बेमुदत संपाला आजपासून सुरुवात
नवी दिल्ली : सुखोई विमान तयार करणाऱ्या हिंदुस्थान (एचएएल)मध्ये बेमुदत संपाला आजपासून सुरुवात होत आहे. भारताची हवाई सुरक्षा करणारे हेलिकॉप्टर्स आणि विमाने यांना तांत्रिक सुविधा आजपासून बंद होणार आहे. हिंदुस्थान एरोनॉटीक्स लिमिटेड या कंपनीत साधारण २० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. भारतातील 9 टोटल डिव्हिजन आज पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी त्यांनी ही संपाची हाक दिली आहे. नाशिकमध्येही 3500 कामगार यात सहभागी झाले आहेत.
हिंदुस्थान एरोनॉटीक्स लिमिटेड या कंपनीत साधारण २० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. इथल्या कामगार संघटनांनी ३५ टक्के पगार वाढीची मागणी केली होती. पण त्यांना ८ टक्के पगारवाढ मिळू शकते अशी माहीती संघटनांनी दिली.वेतनवाढीचा करार न केल्याने हा संप पुकारण्यात आला आहे. सर्व कामगार कर्मचारी आज पासून ओझर एचएएल गेट वर संपात सामील होणार आहेत.