मुंबई  : 'हल्दीराम भुजियावाला'चे मालक महेश अग्रवाल यांचे शुक्रवारी रात्री सिंगापूरमध्ये निधन झाले आहे. महत्त्वाचं  वाढदिवसाच्या एक दिवसाआधीच त्यांचे निधन झाले आहे.  यकृताच्या गंभीर आजारामुळे ते त्रस्त होते.  गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबीयांना सिंगापूरमध्ये हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे सिंगापूरच्या नियमांनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या कठिण काळात त्यांची पत्नी मीना आणि मुलगी अवनी त्यांच्यासोबत सिंगापूरमध्ये होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे त्यांचे कुटुंबीय हे सिंगापूरमध्येच अडकले आहेत. अग्रवाल यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन मुली असा त्यांचा परिवार आहे. जानेवारीत सिंगापूरच्या रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते.  त्यांच्यावर केलेली शस्त्रक्रियाही यशस्वी झाली होती. पण त्यानंतर दुसरा संसर्ग बळावल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.


दरम्यान, त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या पत्नीने आणि मुलीने भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण पण सध्या देशभरात लॉकडाउन असल्याने हे शक्य नाही.  दरम्यान एका वृत्तानुसार, बुधवारी पहाटे त्यांना दिल्लीत परत घेऊन येण्यासाठी एका विमानाचे आयोजन करण्यात येण्याची शक्यता आहे.