नवी दिल्ली : गेल्या काहीवर्षांपासून निर्भया प्रकरणातील दोषींना फक्त तारीख पे तारीख मिळताना दिसत आहे. अखेर त्यांच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. २० मार्च रोजी निर्भया प्रकरणातील पीडितेला अखेर न्याय मिळणार आहे. फाशी दरम्यान कोणत्याही प्रकारची चूक होवू नये म्हणून जल्लाद पवन सराव करत आहे. दोषींना फाशी देण्यासाठी जल्लाद पवन मेरठमधून बुधवारी तिहार जेलमध्ये दाखल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोषींना फाशी देण्याच्या प्रक्रियेची पूर्ण तपासणी आणि फाशीसाठी वापरण्यात येणाऱ्या दोरखंडाची मजबुती शिवाय तो दोरखंड ओढण्याची पूर्ण तयारी जल्लाद पवनने केली आहे. जल्लाद पवनने आतापर्यंत कधीही फाशी दिली नाही. त्याचे वडील आणि आजोबा देखील जल्लाद होते. 


दरम्यान, २० मार्च रोजी पहाटे ५.३० वाजता निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी देण्यात येणार आहे. दोषी मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा, आणि अक्षय कुमार या नराधमांना फाशी देण्यात येणार आहे. 
 
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणी दोषी असलेल्या अक्षय ठाकूरची पत्नी, पुनिता ठाकूरने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणी, कोर्टाने सुनावणीची तारीख १९ मार्च निश्चित केली आहे.