काश्मीरमध्ये शांतता निर्माण होण्यासाठी सकारात्मक पाऊल
एकीकडे देशात दहशतवादी कारवाया सुरु असताना केंद्राने काश्मीरमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचले आहे.
नवी दिल्ली : एकीकडे देशात दहशतवादी कारवाया सुरु असताना केंद्राने काश्मीरमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचले आहे.
दगडफेकीचे गुन्हे मागे
दहशतवादी बुरहाण वाणीला ठार केल्यानंतर त्याच्या समर्थकांनी केलेल्या दगडफेकीचे गुन्हे केंद्र सरकारने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
'पद्मावती'मुळे ठिकठिकाणी तणाव
काश्मीरमध्ये शांततेची गरज असल्याचं केंद्रीयमंत्री अहिर यांनी सांगितलंय, तर देशभर पद्मावती चित्रपटामुळे ठिकठिकाणी तणाव सुरु आहे.
यावर कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचे अधिकार राज्यांना असल्याचंही त्यांनी सांगितलंय.