लखनऊ: सध्या देशभरात हनुमानाच्या जातीवरून सुरु असलेल्या राजकीय युद्धात उत्तर प्रदेशचे मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी उडी घेतली आहे. त्यांनी हनुमान हा जाट असल्याचा दावा केलाय. कुणीही संकटात असेल तर हनुमान त्याला मदत करायचा. जाट समाजाचे लोकही एखादी व्यक्ती ओळखीची नसेल किंवा एखाद्या प्रकरणाशी आपला संबंध नसला तरी संकटात असलेल्या व्यक्तीला मदत करतात. हे सर्व गुण पाहता हनुमान जाट समाजाचाच असावा, असे लक्ष्मी नारायण चौधरी यांनी म्हटले. 
 
 या वादाला सर्वप्रथम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यामुळे तोंड फुटले होते. राजस्थानमधील एका प्रचारसभेत त्यांनी हनुमान दलित असल्याचे म्हटले होते. यानंतर बहराइच येथील भाजप खासदार सावित्रीबाई फुले यांनी त्यापुढे जात दलित असल्यामुळे हनुमानावर अन्याय झाल्याचा निष्कर्ष काढला होता. हनुमान हा दलित होता व मनुवाद्यांचा गुलाम होता. दलित आणि मागास जातींना त्या काळात वानर व राक्षस संबोधले जायचे. रावणाविरुद्धच्या लढाईत रामला हनुमानाची खूप मदत झाली होती. मात्र, दलित असल्यामुळे रामाने हनुमानाला मानव करण्याऐवजी वानरच ठेवले, असे तर्कट सावित्रीबाई फुले यांनी मांडले होते. 
 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हनुमानजी मुस्लिम होते', भाजपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य



 यानंतर केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी हनुमानाला थेट आर्य ठरवले होते. राम आणि हनुमानाच्या युगात कोणतीही जातीव्यवस्था अस्तित्वात नव्हती. कुणीही दलित, वंचित, शोषित नव्हतं. वाल्मिकी रामायण आणि रामचरितमानस वाचलंत तर तुम्हाला कळेल की, तेव्हा कोणतीही जातिव्यवस्था अस्तित्वातच नव्हती. त्यावेळी केवळ आर्य जात अस्तित्वात होती होती. त्यामुळे हनुमान आर्य जातीचे महापुरुष होता, असे सत्यपाल सिंह यांनी म्हटले होते.


रामभक्त हनुमानाच्या जातीवरून राजकीय युद्ध!
 
 या सगळ्या वक्तव्यांमुळे सध्या देशभरात बराच गदारोळ माजला आहे. मात्र, तरीही भाजपचे नेते शांत बसायला तयार नाहीत.