नवी दिल्ली : शाहरुख खानसोबत 'परदेस' सिनेमात दिसलेली बॉलिवूडची अभिनेत्री महिमा चौधरी हिचा आज वाढदिवस... दिर्घकाळापासून बॉलिवूडपासून दुरावलेली ही अभिनेत्री आज कशी दिसते, हे अनेकांना जाणून घ्यायचं असेल... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड पदार्पणानंतर काही मोजके सिनेमे सोडले तर महिमाच्या वाट्याला काही फारसे चांगले सिनेमे आले नाही... आज महिमा ४४ वर्षांची झालीय. 


नुकतीच एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंबईत महिमा दिसली होती. तेव्हा ती अशी दिसत होती... 


महिमा चौधरी


महिमाचं खरं नाव रितू चौधरी... भारतीय वडील आणि नेपाळी आईची ही मुलगी... महिमाचा जन्म दार्जिलिंगमध्ये झाला होता. दार्जिलिंगमध्ये एक ब्युटी पेजेंट जिंकल्यानंतर तिनं मॉडेलिंग आणि सिनेमा क्षेत्र निवडलं. ९० च्या दशकाच्या सुरुवातीला तिनं अनेक जाहिरातींत काम केलं... सिनेमात दिसण्यापूर्वी तिनं एका म्युझिक चॅनलवर व्हिडिओ जॉकी म्हणूनही काम केलंय.