Happy Holi 2022: कोणताही रंग तुमच्या स्मार्टफोनला खराब करु शकणार नाही, फक्त या Tricks फॉलो करा
अशा परिस्थीतीत तुम्ही काय कराल? तुमच्या फोनला या सगळ्यापासून कसं वाचवाल?
मुंबई : होळी अवघ्या काही दिवसांवरती आली आहे. सगळे लोक जोरदार तयारीला देखील लागले आहेत. होलीका दहनानंतर दुसऱ्याच दिवशी धुलीवंदन साजरा केला जातो. ज्यामध्ये लोक रंगांची उधळण करतात. तसेच गाणं लावून नाच गाण्याचा देखील प्रोग्राम असतो. यामध्ये मित्र-मैत्रीण किंवा घरातील व्यक्ती एकमेकांना रंगाने रंगवण्याचा आणि पाण्याचे भिजवण्याचा प्लॅन करत असतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा की, होळीच्या दिवशी कोणीही तुमहाला कधीही रंग लावला जाऊ शकतो. कधीही रंग लावू शकतो आणि अशा परिस्थितीत तुमचा स्मार्टफोनला सगळ्यात जास्त धोका आहे. कारण यामुळे फोन भिजण्याची आणि खराब होण्याची शक्यता जास्त आहे.
परंतु अशा परिस्थीतीत तुम्ही काय कराल? तुमच्या फोनला या सगळ्यापासून कसं वाचवाल? याबद्दल आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.
होळी खेळायला जाण्यापूर्वी या गोष्टी करा
होळीच्या दिवशी जेव्हा तुम्ही घराबाहेर पडाल, तेव्हा तुमचा स्मार्टफोन किंवा इतर गॅजेट्स वॉटरप्रूफ केस, पॉलिथिन किंवा फॉइलमध्ये ठेवा. त्यामुळे जर कोणी तुमच्यावर पेंट किंवा पाणी सांडले, तर ते वॉटरप्रूफ केस आणि फॉइल तुमच्या स्मार्टफोनचं संरक्षण करेल.
रंगाचे डाग पडणार नाही याची काळजी घ्या
अनेक वेळा असे घडते की जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला, चार्जरला किंवा इअरफोनला रंगीत हातांनी स्पर्श केला तर त्यावर रंगाचे डाग पडतात. ही गोष्ट टाळायची असेल, तर होळी खेळण्यापूर्वी स्मार्टफोन, इअरफोन आणि चार्जरवर ग्लिसरीन, मॉइश्चरायझर किंवा कोणतीही क्रीम लावा, अशा प्रकारे क्रीमला रंग लागणार नाही.
अशा प्रकारे स्मार्टफोनला दुहेरी संरक्षण द्या
तुम्ही स्मार्टफोनला वॉटरप्रूफ कव्हर किंवा फॉइलमध्ये ठेवून पाण्यापासून वाचवू शकता. काही वेळा असे असूनही स्मार्टफोन ओला होतो. यासोबतच स्मार्टफोनच्या खुल्या पोर्टमध्ये जसे की चार्जिंग पोर्ट, स्पीकर ग्रिल इत्यादींमध्ये पाणी सहज प्रवेश करू शकते. हे टाळण्यासाठी आणि तुमच्या स्मार्टफोनला दुहेरी संरक्षण देण्यासाठी या ओपन पोर्ट्सवर डक्ट टेप लावा.
यानंतरही तुमच्या स्मार्टफोनमध्ये चुकून पाणी गेल्यास तो चार्ज करू नका, आधी फोनमधील पाणी काढून टाका, मगच फोन चार्जिंगला ठेवा अन्यथा शॉक लागू शकतो.