Toll Naka Crime: टोल नाक्यावर टोल भरणे अनेकांना त्रासदायक वाटते. अशावेळी ते कोणतं तरी कार्ड दाखवतात. किंवा कोणत्यातरी राजकारण्याची ओळख सांगून टोल नाक्यावरुन पैसे न देता निसटण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी टोलनाका कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत झाल्याचे प्रकार आपण पाहिले असतील. त्यामुळे टोलनाक्यावर काम करणारे कर्मचारी हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या दहशतीखाली असतात. टोल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांमध्ये लहान गाडी चालकांपेक्षा मोठ्या गाड्या घेऊन फिरवणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. दरम्यान टोल कर्मचाऱ्याला गाडीने चिरडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशच्या कोतवाली हद्दीतील चिजारसी टोल प्लाझा येथील टोलनाक्यावरील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एका मोठ्या कारने टोल कर्मचाऱ्याला चिरडल्याचे दिसत आहे. येथील टोलनाक्यावर काम करणाऱ्या शिफ्ट इन्चार्जला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने नुसती धडकच दिली नाही तर त्याला कारखाली चिरडण्याचाही प्रयत्न केला. त्याच्या अंगावरुन कार घातली. 


लग्नमंडपात नवरी हाताला मेहंदी लावून तयार, नवरा मावस बहिणीला घेऊन फरार


यामध्ये टोल शिफ्ट इन्चार्ज गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टोल कर्मचाऱ्याच्या इतर सहकाऱ्यांनी धावपळ केल्याने त्याचा जीव वाचला आहे. त्याचवेळी दुसरीकडे कार चालकाने घटना स्थळावरुन धूम ठोकली आहे. याप्रकरणी टोल व्यवस्थापकाच्या वतीने कोतवालीत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 



रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे शिफ्ट इन्चार्ज शेखर यादव हे चिजारसी टोल प्लाझा येथे काम करत होते. काही कामानिमित्त ते टोलनाक्याच्या दिशेने येत होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांना धडक दिली. एवढेच नव्हे तर ती कार त्यांना तुडवत निघून गेली. अचानक अंगावर आलेली कार पाहून शेखर यादव यांना धक्का बसला. पण ते सावरले आणि त्यांनी स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.


Central Railway Job: मध्य रेल्वेत हजारो पदांची भरती, दहावी उत्तीर्णांना मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी


त्याचवेळी आवाज ऐकून इतर टोल कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कार चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत कार चालक कारसह घटनास्थळावरून पळून गेला. टोल कर्मचाऱ्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून घटनेची माहिती पोलिसांना दिली.


टोल व्यवस्थापक संदीप जाधव यांच्या वतीने कोतवालीत पोलीस स्थानकात यासंदर्भात तक्रार देण्यात आली आहे. तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे कोतवाली प्रभारी नीरज कुमार यांनी सांगितले. टोलनाक्यावरून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कार चालकाला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.