Trending News : दोन वेगवेगळ्या घटनेत रहिवाशी इमारतीच्या लिफ्ट (Lift) बंद पडल्याच्या घटना घडल्या आणि या दोनही घटनांमध्ये दोन लहान मुलं लिफ्टमध्ये अडकून पडली होती. लिफ्ट बंद पडून मुलं आतमध्ये अडकल्याची कल्पना कोणालाच नव्हती. आणखी थोडावेळ झाला असता तर या मुलांच्या जीवावरही बेतू शकलं असतं. यातील एका मुलाने जराही घाबरता, चक्क लिफ्ट बसून आपला होमवर्क (HomeWork) पूर्ण केला. लिफ्ट बंद पडल्याच्या घटनेचा संताप व्यक्त होत असतानाच त्या मुलाच्या धैर्याचंही कौतुक केलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
फरीबादमधली (Faridabad) ही घटना आहे. गौरवान्वित नावाचा आठ वर्षांचा मुलगा संध्याकाळी पाच वाजता ट्यूशनसाठी घरातून बाहेर पडतो आणि संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान घरी परततो. पण घटनेच्या दिवशी वाजून गेल्यानंतरही गौरवान्वित घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या पालकांनी ट्युशनमध्ये फोन करुन माहिती दिली. पण ट्यूशन टीचरने दिलेली माहिती ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. गौरवान्वित ट्यूशनला आलाच नसल्याचं टीचरने सांगितलं. घाबरलेल्या पालकांनी तात्काळ त्याचा शोध सुरु केला. शोध घेत असतानाच त्यांना इमारतीची लिफ्ट बंद असल्याचं कळलं. पालकांनी तात्काळ याबाबत इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला विचारलं. त्याने इमारतीची लिप्ट संध्याकाळी पाच वाजल्यापासून बंद असल्याचं सांगितलं. 


पालकांच्या मनात शंकेची पाल चुकचूकली. त्यांनी तात्काळ हालचाली सुरु केल्या आणि लिफ्ट उघडली, गौरवान्वित लिफ्टमध्येच अडकून पडला होता. गौरवान्वित सुखरूप असल्याचं पाहून त्यांना दिलासा मिळाला. पण तीन तासांपासून लिफ्ट बंद असून कोणीही याची दखल घेतली नाही, लिफ्टमध्ये कोणी अडकलं आहे का याबाबत माहिती घेतली नाही, यावरुन गौरवान्वित पालकांनी नाराजी व्यक्त केली. 


लक्ष वळवण्यासाठी होमवर्क 
आणखी थोडावेळा लिफ्ट बंद राहिली असती तर कदाचित दुर्देवी घटना घडू शकली असती. सुदैवाने गौरवान्वित सुखरूप होता. याबाबत गौरवान्वितला विचारण्यात आल्यावर त्याने आपण लक्ष वळवण्यासाठी होमवर्क करत बसलो असं उत्तर दिलं. लिफ्ट बंद पडल्यावर आपण जोरजोरात ओरडलो. इमरजेंसी बटनही दाबलं पण कोणीच मदतीला आलं नाही. त्यामुळे न घाबरता त्याने लिफ्टमध्ये बसून होमवर्क पूर्ण केला. 


11 वर्षांची मुलगी लिफ्टमध्ये अडकली
फरीदाबादमध्ये घडलेल्या दुसऱ्या एका घटनेत रहिवाशी इमारतीच्या लिफ्टमध्ये 11 वर्षांची मुलगी अडकली होती. स्नेहा असंया मुलीचं नाव असून ती सहाव्या इयत्तेत शिकते. रविवारी स्नेहा ट्यूशला जाण्यासाठी लिफ्टमध्ये शिरली पण लिफ्ट मध्ये बंद पडली. तब्बल अडीच तास स्नेहा लिफ्टमध्येच अडकली होती. मोठ्या प्रयत्नानंतर लिफ्ट उघडून स्नेला सुखरुप बाहेर काढण्यात आलं. स्नेहाच्या संपूर्ण अंगाला घाम फुटला होता. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. सुदैवाने तिची प्रकृती ठिक होती.