अहमदाबाद : गुजरात कॉंग्रेसचे शक्ती सिंह गोहिल यांच्या एका वादग्रस्त विधानाने वातावरण तापलं आहे. ते म्हणाले होते की, ‘हार्दिक पटेल यांच्यात सरदार पटेल यांचा डिएनए आहे’.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपने या वक्तव्याचा निषेध केला असून हे सरदार पटेल यांचा अपमान करणारी गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. यावर सरदार पटेल यांच्या नातेवाईकांनीही दोघांची तुलना होणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, सरदार पटेल यांनी ‘देशाच्या एकतेसाठी काम केलं’ तर हार्दिक ते करत नाहीये. 


गुजरात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शक्ती सिंह यांनी सोमवारी वक्तव्य केलं होतं की, राज्यात सत्ताधारी भाजपचा सामना करण्यासाठी हार्दिक पुढे येतोय. त्याच्यात ‘सरदार पटेल यांचा डिएनए’ आहे. ज्याला इंग्रजांकडून तोडलं किंवा दाबलं गेलं नाही. हार्दिकची कथित सेक्स टेप लीक प्रकरणावर ते म्हणाले की, हार्दिक पटेल आपल्या समुदायावर होत असलेल्या अन्याया विरोधात लढाई लढत आहे. जे अमित शाह यांच्या करोडो रूपयांनीही विकत घेतले जाऊ शकत नाही’.


भाजप नेता मनसुख मंडाविया गोहिल यांच्या वक्तव्यावर म्हणाले की, हार्दिकची लोह पुरूषासोबत तुलना करणे हा गुजरात आणि देशाचा अपमान आहे.