हार्दिक पटेलना काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी, गुजरात प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती
पाटीदार आरक्षण आंदोलनातले युवा नेते हार्दिक पटेल यांन काँग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे.
गांधीनगर : पाटीदार आरक्षण आंदोलनातून उदयाला आलेले युवा नेते हार्दिक पटेल यांन काँग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे. हार्दिक पटेल यांना गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचा कार्याध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं. काँग्रेसचे संघटना महासचिव केसी वेणुगोपाल यांनी याबाबत माहिती दिली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी हार्दिक पटेल यांची तत्काळ नियुक्ती करायला परवानगी दिली आहे, असं वेणुगोपाल म्हणाले.
काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये पाटीदार समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मोठं आंदोलन झालं होतं. हार्दिक पटेल या आंदोलनाचा चेहरा होता. यानंतर हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
हार्दिक पटेल यांच्याशिवाय काँग्रेसने महेंद्रसिंग परमार यांना आणंद, आनंद चौधरी यांना सूरत आणि यासीन गज्जन यांची देवभूमी द्वारका जिल्ह्याच्या काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नेमणूक केली आहे.