राहुल गांधी, हार्दिक पटेल यांच्यात सिक्रेट चर्चा?, व्हिडिओ व्हायरल
कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांची गुप्त भेट झाल्याचे वृत्त आहे. या कथीत भेटीचा एक व्हिडिओही जोरदार व्हायरल झाला आहे. मात्र, स्वत: हार्दिक पटेल यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावत अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे म्हटले आहे.
अहमदाबाद : कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांची गुप्त भेट झाल्याचे वृत्त आहे. या कथीत भेटीचा एक व्हिडिओही जोरदार व्हायरल झाला आहे. मात्र, स्वत: हार्दिक पटेल यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावत अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे म्हटले आहे.
राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या कथीत भेटीच्या वृत्ताबाबत बोलताना हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे की, 'मी राहुल गांधी यांन भेटलो नाही. जर, मला राहुल गांधी यांना भेटायचे असते तर, मी सर्वांसमोरच भेटलो असतो. त्यामुळे मला अधिक गती प्राप्त झाली आसती. राहुल गांधी यांना मी चोरी-छुपके का भेटू?', असा सवालही हार्दिक पटेल यांनी विचारला आहे. दरम्यान, सोमवारी सकाळपासूनच वृत्त येत आहे की, राहुल गांधी गुजरातमधील रॅलीपूर्वी हार्दिक पटेल यांच्यासोबत चर्चा करतील.
दरम्यान, टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीने एका व्हिडिओच्या आधारे एक्सक्लूसिव वृत्त दिले आहे. या वृत्तात प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओत हार्दिक पटेल आपल्या सहकाऱ्यांसोबत एका हॉटेलमध्ये घुसताना दिसत आहेत. दरम्यान, याच हॉटेलमध्ये राहुल गांधीही उपस्थित होते असे सांगितले जात असून, दोन्ही नेत्यांमध्ये गुजरात निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
रविवारी रात्री ११.५३ मिनिट ते सोमवार संध्याकाळी ४.१४ वाजेपर्यंतच्या एकूण ५ व्हिडिओ क्लिप्स आहेत. ज्यात हार्दिक पटेल हॉटेलमध्ये जाताना आणि बाहेर येताना दिसत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हार्दिक पटेल यांनी भाजला सोडचिठ्ठी दिलेल्या निखिल सवानी, अशोक गेहलोत आणि गुजरात कॉंग्रेसचे अध्यक्ष भारतसिन सोलंकी यांच्यासोबतही चर्चा केली आहे. हार्दिक पटेल यांना राहुल गांधी यांच्या भेटीबाबत विचारले असता, ते म्हणाले, मी राहुल गांधी यांना भेटलो नाही. मात्र, अशोक गेहलोत आणि गुजरात कॉंग्रेसचे अध्यक्ष यांच्यासोबत पाटीदार आंदोलनाबाबत चर्चा केली.