मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हजारो शिवसैनिक अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेत असताना आज मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. अयोध्येत जाऊन शिवसेनेने राम मंदिर मुद्द्यावरून सरकारवर दबाव वाढवला असताना यामध्ये डाव्या संघटनाही मागे नाहीयत.  मुंबईत राजगृहापासून चैत्यभूमीपर्यंत 'संविधान बचाव रॅली' काढण्यात येणार आहे. या रॅलीत देशभरातील युवा संघटनांमधील महत्त्वाचे चेहरे दिसणार आहेत.


14 संघटना रस्त्यावर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


वाढत्या फॅसिझमच्याविरोधात देशातल्या चौदा प्रमुख युवा संघटना एकवटणार आहे. यूनायटेड यूथ फ्रंट’च्या माध्यमातून काढण्यात येणाऱ्या या रॅलीला दुपारी एक वाजता सुरूवात होईल.



या 'संविधान बचाओ  रॅली'मध्ये १४ युवा संघटनांसह गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दीक पटेल, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूमधील विदयार्थी संघटनेचे नेते कन्हैयाकुमार यामध्ये दिसतील.



यासोबतच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री आ.जितेंद्र आव्हाड, मुंबई अध्यक्ष माजी मंत्री सचिन अहिर आणि काँग्रेसचे युवा नेते सहभागी होणार आहेत.