नवी दिल्ली : गुजरातचे माजी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये गृहमंत्री असलेले हरेन पांड्या यांच्या हत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने १२ पैकी ७ आरोपींना दोषी ठरविण्यात आले आहे. यासर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहेत. २६ मार्च २००३ रोजी गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली होती. दरम्यान, गुजरात उच्च न्यायालयाने या आरोपींना निर्दोष मुक्त सोडले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात या आव्हान देण्यात आले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरेन पांड्या यांच्या हत्येप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी खालच्या न्यायालयाच्या निर्णयाला कायम ठेवून १२ आरोपींना दोषी ठरवले आहे.२०११ मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने सर्व आरोपींची सुटका केली होती. या निर्णयाविरूद्ध सीबीआय आणि गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.



गुजरात उच्च न्यायालयाने या सर्वांना निर्दोष मुक्त केले होते. त्यानंतर सीबीआयने केलेल्या तपासामध्ये गुजरातमधील २००२ च्या दंगलीचा बदला घेण्यासाठी पांड्या यांची हत्या केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. गुजरात सरकार आणि सीबीआयने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी काल अंतिम सुनावणी झाली. यावेळी त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलेल्यांना दोषी ठरविण्यात आले.
 
२६ मार्च २००३ ला हरेन पांड्या सकाळी फेरफेटका मारण्यासाठी अहमदाबादच्या लॉ गार्डन परिसरात गेले असता, त्यांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. त्यावेळेस ट्रायल कोर्टाने दहशदवाद विरोधी कायद्याअंतर्गत दोषींना पाच वर्षांपासून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आरोपींच्या आपीलनंतर २९ ऑगस्ट २०११ ला गुजरात उच्च न्यायालयाने सेशन न्यायालयाचा निर्णय रद्द करून सर्व आरोपींची सुटका केली होती. सीबीआयने २०१२ मध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.