पेट्रोल-डिझेलचं टेंशन संपणार, येतेय पहिली Solar Car, 45 मिनिटांमध्ये होणार फूल चार्ज

250 किमी रेंज, 45 मिनिटांमध्ये होणार फूल चार्ज, येतेय भारताची पहिली सौर ऊर्जावर चालणारी इलेक्ट्रिक कार. जाणून घ्या अधिक माहिती. 

| Dec 31, 2024, 17:29 PM IST
1/7

इलेक्ट्रिक कार

बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिक कार आणि दुचाकी येत आहेत. या गाड्यांना आणि कारला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

2/7

पहिली कार

अशातच आता सौर ऊर्जेवर चालणारी कारही लवकरच बाजारात येणार आहे. ही भारतामधील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी कार असणार आहे.   

3/7

वेव्ह मोबिलीटी

वेव्ह मोबिलीटी ही कंपनी इव्हा या सौर ऊर्जेवरच्या कारचं अपग्रेडेड व्हर्जनदेखील सादर करणार आहेत. ज्यामध्ये सौर ऊर्जेवर चालणारी ही पहिली कार असणार आहे. 

4/7

Vayve Solar

Vayve Solar या कारची किंमत ही सुमारे 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते. परंतु, या कारसंदर्भातील कोणतीही माहिती कंपनीने अद्याप दिलेली नाहीये. 

5/7

पार्किंग

ही कार मोठ्या ट्रॅफिकमध्ये देखील सहजपणे जाऊ शकते. त्यासोबतच तिचे पार्किंग देखील खूप कमी जागेत होईल. ही कार खूपच छोटी आहे. 

6/7

अंतर

ही कार 50 पैसे खर्चात एक किलोमीटर अंतर पार करते. त्यासोबतच ही कार कमाल वेगमध्ये तासाला 70 किलोमीटर जाऊ शकते.   

7/7

सोलर पॅनेल

कंपनीच्या म्हणण्यानुसार ही कार पूर्ण चार्जमध्ये 250 किलोमीटर जाऊ शकते. तर छतावरच्या सोलर पॅनेल्समुळे ही कार वर्षात तीन हजार किलोमीटर जाऊ शकते.