सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी हल्ली लोक काय करतील याचा नेम नाही. अल्पावधित लोकप्रिय होण्याच्या उद्देशाने लोक फारच विचित्र गोष्टी करतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. यामध्ये एक व्यक्ती चक्क किंग कोर्बासारखे शूज घालून फिरताना दिसत आहे. हा शूज दिसायला एवढे रिअॅलिस्टीक आहेत की या व्यक्तीने पायात खरोखरच साप वगैरे घातलेत की काय असं वाटतं. हे बूट पाहून कोणीही पहिल्यांदा घाबरुन आणि नंतर गोंधळून जाईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ देशातील लोकप्रिय उद्योजक हर्ष गोयंका यांनी शेअर केला आहे. गोयंकाही हे शूज पाहून इम्प्रेस झाले आहेत. या व्हिडीओवर लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांनी आपल्या प्रोफाइलवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन द्यावी असं गोयंका यांनी म्हटलं आहे.



आता गोयंका यांनीच या व्हिडीओसाठी कॅप्शन मागवल्याने अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. पाहूयात कोणाचं काय म्हणणं आहे.


हिस्ससस शूज...



स्नायके



शेफाली



नाग देव



नागराज शूज



स्नेक वॉक



हॅव फन



या व्हिडीओला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत. शेकडोच्या संख्येनं या व्हिडीओवर कमेंट्स करण्यात आले असून अनेकांच्या क्रिएटीव्हीटीला बहर आल्याचं कमेंट सेक्शनमध्ये दिसत आहे.