उद्योजक हर्ष गोयंका नेहमीच ट्विटरला काही सकारात्मक तसंच प्रेरणादायी गोष्टी शेअर करत असतात. अनेकदा उत्कंठा वाढवणाऱे ट्विट करत ते आपल्या फॉलोअर्सशी संवाद साधत असतात. नुकतीच त्यांनी अशीच एक पोस्ट शेअर केली असून युजर्सना संभ्रमात पाडलं आहे. या फोटोत अनेक घरं दिसत असून हर्ष गोयंका यांनी आपल्या फॉलोअर्सना या फोटोतील मांजर शोधण्याचं आव्हान दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हर्ष गोयंका यांनी फोटो शेअर करत म्हटलं आहे की "जर तुम्ही योग्य निरीक्षक असाल तर 10 सेकंदात मांजर शोधाल".


हर्ष गोयंका यांची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टला चार हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसंच 270 जणांनी रिट्विट केलं असून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. 


सुरुवातीला तुम्हाला यामध्ये फक्त घरं दिसतील, पण जर तुम्ही निरखून पाहिलंत तर सहजपणे मांजर शोधू शकाल. 



अनेक युजर्सना ही मांजर शोधण्यात लगेचच यश आलं असून काहींना मात्र थोडा जास्त वेळ लागला. एका युजरने उत्तर देत म्हटलं आहे की "उजव्या हाताला सर्वात वर. दहा सेकंदापेक्षा जास्त वेळ लागला तरीही...". राजकीय समीक्षक तेहसीन पूनावाला यांनीही या फोटोवर कमेंट केली असून दोन सेकंदापेक्षा कमी वेळ लागल्याचं म्हटलं आहे. 


तर एका युजरने पुढच्या वेळी थोडा अवघड प्रश्न विचारा असं म्हटलं आहे. काहींनी उत्तर देताना मांजर कुठे आहे हे वर्तुळ करुन दाखवलं आहे. 


मग तुम्हाला ही मांजर शोधण्यासाठी किती सेकंद लागले