Gangster Yogesh Kadyan Interpol red corner notice: अवघ्या 19 वर्षांच्या गँगस्टर योगेश कादियानविरोधात इंटरपोलने रेडकॉर्नर नोटीस जारी केली आहे. लहान वयातच योगेशची इतकी दहशत पसरली होती, की लोकं त्याच्या नावानेही घाबरतात. हरियाणातल्या (Hariyana) गावागावत योगेशची दहशत आहे. योगेश कादियान हा हरियाणातल्या झज्जर इथं राहाणार असून बंबीहा गँगशी (Bambiha Gang) त्याचा संबंध असल्याचंही बोललं जातं. काही महिन्यांपूर्वी बोगस पासपोर्ट बनवून तो अमेरिकेला पसार झाला. लहान वयातच मोठमोठ्या लोकांच्या मनात धडकी भरवणारा योगेश (Yogesh Kadyan) काही गुंडप्रवृत्तीच्या लोकांच्या सहवासात आला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं आहे. एका निरागस चेहऱ्यामागे इतकी भयानक कहाणी आहे की सामान्य माणूस विचारही करु शकत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खतरनाक गँगस्टर
गुन्हेगारी जगतात योगेशने खूप कमी वयात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. हरियाणा पोलिसांबरोबरच तपास यंत्रणांच्याही तो रडारवर आहे. योगेश कादियान दिल्लीचा दाऊद नावाने प्रसिद्ध असलेल्या नीरज बवाना आणि गँगस्टर हिमांशुभाऊचा उजवा हात मानला जातो. योगेश शार्पशूटर आहे आणि आधुनिक शस्त्र हाताळण्यात तो एक्स्पर्ट मानला जातो. बंबीहा गँग आणि लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये (Lorence Bishnoi Gang) कट्टर वैर आहे. योगेश बंबीहा गँगसाठी काम करतो आणि त्याच्या नावावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गँगस्टर हिमांशुभाऊ हा अमेरिकेत लपला असून योगेश कादियान त्याच्याबरोबर राहात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर इंटरपोलने त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस (Red Corner Notice) जारी केली. आता सर्व देशांचे पोलीस त्याचा शोध घेतायत. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश कादियानवर हत्या, हत्येचा प्रयत्न, सामुहिक गुन्हेगारी आणि प्रतिबंधित शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पंजाब आणि हरियाणात बंबीहा गँग आणि गोल्डी बराज गँगध्ये खूनी खेळ सुरु आहे. यो दोन गँगदरम्यान अनेकवेळा गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. यातल्या अनेक घटनांमध्यो योगेश कादियानचा समावेश आहे. या दोनही गँगमध्ये शाळा किंवा कॉलेजमधल्या मुलाचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवाला याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला लॉरेन्स बिश्नोई हा देखील कॉलेज शिक्षणादरम्यानच गँगस्टर बनला.


NIA ने देशातल्या गँगस्टरविरुद्ध कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. पंजाब आणि हरियाणातल्या अनेक गँगस्टरविरुद्ध एनआयएने कारवाई केली आहे. यामुळे अनेक गँगस्टर देश सोडून परदेशात फरार झाले आहेत. गेल्या काही वर्षात भारतातले अनेक गँगस्टर अमेरिका आणि कॅनडात लपले आहेत. भारतातल्या जवळपास 9 मोस्ट वॉन्टेड गँगस्टर आणि खलितस्तानी दहशतवाद्यांनी कॅनडाचा आश्रय घेतलाय. भारतीय तपास यंत्रणांनी याची माहिती कॅनडा सरकारला दिलाय, पण यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.