`सॉरी मम्मी-पापा... I Quit, मी इंजिनिअर होऊ शकत नाही` मुलीने कॉलेजच्या इमारतीवरुन...
आपल्या मुलांनी खेळापासून शिक्षणापर्यंत सगळीकडेच अव्वल राहावं अशी इच्छा पालक बाळगून असतात. यातूनच मुलांवर त्यांच्या इच्छेविरुद्ध अपेक्षांचं ओझं लादलं जातं. पण आपल्या मुलांना ते झेपेल की नाही याचा विचार अनेक पालक करत नाहीत.
Student Suicide Case : इंजिनिअरींगचा (Engineering) अभ्यास करणाऱ्या एका मुलीने कॉलेजच्या इमारतीवरुन उडी मारत आत्महत्या केली (Girl Commits Suicide). या घटनेने कॉलेजमध्ये एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत मुलीला रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारापूर्वीच त्या मुलीचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या हाती सुसाइड नोट (Suicide Note) लागली असून यात मुलीने आई-बाबांना सॉरी म्हणत आत्महत्येचं कारण लिहिलं आहे.
जान्हवीने उचललं टोकाचं पाऊल
मृत मुलीचं नाव जान्हवी असं होतं. जान्हवी पानीपतमधल्या PIET कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी (Engineering College) होती. नेहमीप्रमाणी जान्हवी सकाळी कॉलेजला आली. पण दुपारी अचानक तीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. अचानक घडलेल्या या घटनेने कॉलेजमध्ये खळबळ उडाली. जान्हवीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डोक्याला गंभीर मार बसल्याने तिचा जागीत मृत्यू झाला होता.
जान्हवीची सुसाईड नोट पोलिसांची हाती
जान्हवी कॉम्प्यूटर सायन्सची (Computer Science) विद्यार्थिनी होती. तिच्याबरोबर शिकणाऱ्या मैत्रिणींनी दिलेल्या माहितीनुसार जान्हवी गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणावात होती. याच तणावातून तीने आत्महत्या केली असावी असं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांना तपासात जान्हवीच्या खोलीतून एक सुसाइड नोट सापडली आहे.
आत्महत्येचं सांगितलं कारण
जान्हवीने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आत्महत्येचं कारण सांगितलं आहे. अभ्यासाचा ताण सहन होत नाही, मी इंजिनिअर बनू शकत नाही, त्यामुळे आत्महत्येचा मार्ग निवडते. सॉरी, मम्मी-पप्पा I Quit' असं जानव्हीने त्या पत्रात लिहून ठेवलं होतं. जानव्हीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पालकांचा मुलांवर दबाव
अनेक पालक आपल्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवतात. मुलांची आवड-निवड न पाहाताच त्यांनी काय व्हावं याचा निर्णय पालक घेतात. मुलांना कोणत्या गोष्टीत रुची आहे, त्याला काय आवडत याचा विचार न करता केवळ आपल्या इच्छा मुलांना लादल्या जातात आणि त्या पूर्ण करण्यासाठी मुलांवर दडपण आणलं जातं. काही मुलांना झेपतं, पण काही मुलांना कठिण अभ्यासक्रम झेपत नाही. आणि मग आई-वडिलांची अपेक्षा पूर्ण न करता आल्याची खंत मनात ठेवून आत्महत्येसारखा मार्ग निवडतात.