दोन रेल्वे एकाच रुळावर आल्यानं धडकल्या
तेलंगणा इथे दोन रेल्वे गाड्या एकाच रूळावर आल्यानं धडक
चंदीगड : तेलंगणा इथे दोन रेल्वे गाड्या एकाच रूळावर आल्यानं धडक झाली आहे. या धडकेत ३० प्रवासी जखमी झाल्याचं कळतयं. काचेगुडा रेल्वे स्थानकात हा अपघात घडला आहे. तर सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत.
सिग्नलमधील बिघाडामुळे हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे. दोन्ही गाड्यांचा वेग कमी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.