लखनऊ : उत्तर प्रदेशातील हाथरस  (Hathras) सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण रंगू लागले आहे. काँग्रेस नेते राहुल  गांधी ( Rahul Gandhi) आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी-वाड्रा (Priyanka Gandhi) यांनी योगी सरकारवर जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.  महिलांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री तुम्ही जबाबदार आहात, असे त्यांनी थेट योगी आदित्यनाथ यांना सुनावले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल म्हणाले की, देशातील एखाद्या मुलीला मेल्यानंतर न्याय मिळत नाही. है दुर्दैव आहे. राहुल गांधी म्हणाले की, भारतातील एका मुलीवर बलात्कार केला जातो, वस्तुस्थिती दडपली जाते आणि शेवटी अंत्यसंस्कार करण्याचा अधिकारही तिच्या कुटुंबियांकडून काढून घेण्यात आला. हे अपमानकारक आणि अन्यायकारक आहे.



या घटनेवरून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी योगी सरकारवर जोरदार टीका केली आहे. उत्तर प्रदेशात महिला अजिबात सुरक्षित राहिलेल्या नाहीत, बलात्कार करून आरोपी मोकाट फिरत आहेत. कायदा सुव्यवस्था पार बिघडली आहे, असं ट्विट त्यांनी केले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री तुम्ही जबाबदार आहात, असे त्यांनी थेट योगी आदित्यनाथ यांना सुनावले आहे. 


त्याचवेळी, प्रियंका गांधी-वाड्रा म्हणाल्या की, कुटुंब दुपारी अडीच वाजता आक्रोश करत राहिले, परंतु हाथरस पीडितेचा मृतदेह उत्तर प्रदेश प्रशासनाने जबरदस्तीने जाळला. ती जिवंत असताना सरकारने तिला संरक्षण दिले नाही. जेव्हा तिच्यावर हल्ला झाला तेव्हा सरकारने वेळेवर उपचार दिले नाहीत. पीडितेच्या मृत्यूनंतर सरकारने कुटुंबातील सदस्यांकडून मुलीच्या शेवटच्या संस्कारांचे हक्क काढून घेतले, शिवाय तिचा मृताचा आदर केला, असा हल्लाबोल प्रियंका यांनी केला.